Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकरी संघटनेचे उद्या फलटणमध्ये रास्ता रोको आंदोलन राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा

 


फलटण चौफेर दि १४ जून 

आमदार बच्चू कडू यांचे  विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देऊन ते अधिक तीव्र करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने  १५ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता फलटण-पंढरपूर रस्त्यावर आसू फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.



स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी किसान सभा (शरद पवार गट), मराठा क्रांती संघटना तसेच इतर अनेक संघटना सहभागी होणार आहेत.



या आंदोलनाचे नेतृत्व सागर गावडे (प्रहार जनशक्ती पक्ष, फलटण), महेश जगताप (प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन), धनंजय महामूलकर (स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा जिल्हाध्यक्ष), नितीन यादव (स्वाभिमानी शेतकरी संघटना, फलटण) आणि डॉ. रवींद्र घाडगे (जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा) करणार आहेत.फलटण पोलीसांना दिलेल्या निवेदनात आंदोलन शांततेत पार पाडले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.